Pune News : कोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : त्यादिवशी ओळख का दिली नाही या कारणावरून 8 ते 10 जणांच्या टोळक्‍याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. कोंढवा येथील भाग्योदय नगर मध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी आठ ते दहा आरोपींविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फैजल मुजाहिद, तोसिफ खान, अबिद मोकाशी, शहबाज, इरशाद शेख, तजमुल पठाण आणि इतर पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आसिफ मौलाना शेख (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांच्या दोन मित्रांसोबत भाग्योदय नगर येथील लेडी हलीमा शाळेसमोर बसले होते. त्यावेळी त्या ठिकाणी आलेला आरोपी फैजल मुजाहिद याने फिर्यादी यांचा मित्र तनवीर शेख त्याच्यासोबत वाद घातला. यापूर्वी ओळख न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची देखील झाली होती.

याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांच्या दोन्ही मित्रांना बेदम मारहाण केली. तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या ऑफिसच्या शटरची देखील तोडफोड करत नुकसान केले. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.