Pune News : बुलेट सायलेन्सरद्वारे फटाके वाजवताना रागाने पाहिल्यामुळे तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज : बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके वाजवण्याचा आवाज काढत असताना बुलेटस्वाराकडे रागाने पाहणाऱ्या एका तरुणाला चार जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयता, दांडके आणि प्लायवुड पट्टी यांनी बेदम मारहाण केली. चंदननगर येथील विडी कामगार वसाहतीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. 

आदिल मलिक, ओमकार दिलीप भंडारे आणि अन्य दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अब्रार नूरुद्दीन पटेल (वय 20) या तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री च्या सुमारास फिर्यादी हे त्याच्या मित्रासह विडी कामगार वसाहतीतून जात होते. यावेळी फिर्यादी यांच्या तोंडओळखीचा आरोपी आदिल मलिक हा बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाके वाजवण्याचा आवाज काढत होता. यावेळी फिर्यादीने त्याच्याकडे रागाने पाहिले असता त्याचाच राग आल्याने आदिल मलिक याने इतर आरोपींना सोबत घेऊन फिर्यादीला बेदम मारहाण केली. चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.