Bhosri : खिशातला मोबाईल घेतला म्हणून तरुणावर जिवघेणा वार

एमपीसी न्यूज – खिशातला फोन काढून घेतल्याचा राग आल्याने एकाने तरुणाला दगडाने मारून गंभीर करत जिवघेणा हल्ला केला. हा प्रकार शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री भोसरीतील (Bhosri) इंद्रायणीनगर येथे घडला आहे.
Pune : पुणे लोकसभा पोटनिवडणुक : मित्र पक्षाची ताकद जास्त असेल ती जागा त्यांना मिळावी : अजित पवार
याप्रकऱणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अमर ऊर्फ एक्क्या गौतम भोसले (वय 24 रा.भोसरी) याला अटक केली असून भगवान वसंत वाघमारे (वय 32 रा.भोसरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ नारायण वाघमारे व त्याचा मित्र एक्क्या हे इंद्रायणीनगर येथील यशवंत चौक येथे बोलत उभा होते. नारायण याने मस्करीमध्ये एक्क्याचा फोन खिश्यातील फोन काढून घेतला. याचा राग येवून एक्क्याने नारायण याला हाताने मारहाण करत खाली पाडले व डोक्य़ात दगड मारून गंबीर जखमी केले. यावरून एमआयडीसी भोसरी (Bhosri) पोलिसानी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Pune – माजी सैनिक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारपासून पुण्यात