Pune Crime News : पुण्यातील नाना पेठेत तरुणाचा चाकूने भोसकून खून, मध्यरात्री घडला थरार

एमपीसी न्यूज – पुण्यातील नाना पेठ परिसरात मध्यरात्री खुनाचा थरार घडला. चाकूने भोसकून आणि डोक्यात सिमेंटचे ब्लॉक मारून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. मध्यरात्री साडेबाराच्या (Pune Crime News) सुमारास नाना पेठेतील नवा वाडा या ठिकाणी हा प्रकार घडला. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाले आहे. 

 

 

अक्षय लक्ष्मण व्हलाळ (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोघांनी अक्षय याच्यावर चाकूने वार केले. तो खाली कोसळल्यानंतर सिमेंटचे गट्टू त्याच्या डोक्यात (Pune Crime News) मारले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने अक्षयचा मृत्यू झाला. दरम्यान खून झाल्याची माहिती मिळताच समर्थ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चाकूने वार केल्यानंतर हल्लेखोर जागेवरून पसार झाले. समर्थ पोलीस आता त्यांचा शोध घेत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.