मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pune News: किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोथरुड भागात किरकोळ वादातून युवकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यश कालीदास जगताप (वय 18, रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

या प्रकरणी सचिन शंकर कदम (वय 23), प्रवीण शंकर कदम (वय 29 दोघे रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : तालुकास्तरीय हाॅलीबाॅल स्पर्धेत ‘इंद्रायणींचे’च यश

आरोपी सचिन आणि प्रवीण हे यशच्या ओळखीचे आहेत. रात्री अकराच्या सुमारास यश मित्रांबरोबर साईनाथ वसाहतीत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपींनी यशला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करत आहेत.

Latest news
Related news