Maval Crime News : आढले खुर्द गावात पूर्ववैमनस्यातून तरुणावर तलवारीने वार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील आढले खुर्द गावात तिघांनी मिळून पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण केली. तसेच तरुणावर तलवारीने वार करून जखमी केले. ही घटना 21 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.

अविनाश शिवाजी भोईर (वय 27, रा. आढले खुर्द, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी 26 जानेवारी रोजी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन चंद्रकांत येवले, चंद्रकांत शंकर येवले, रोहित चंद्रकांत येवले (सर्व रा. आढले खुर्द, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता दुचाकीवरून कामाला जात होते. आदल्या रात्री झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी रोहन याने त्याच्या घरासमोर अविनाश यांनी अडवले. आरोपींनी फिर्यादींसोबत झटापटी करून त्यांना लोखंडी रॉडने हातावर, पाठीत मारले. तसेच तलवारीने डोक्यात, हातावर, पाठीत वार करून जखमी केले. सहाय्यक पोलीस निरिक्षक उद्धव खाडे तपास करीत आहेत.

या भांडणात आरोपींनी अविनाश याच्यावर तलवारीने वार केले. त्यानंतर अविनाश याने पिस्तुलातून गोळ्या झाडून रोहनचा खून केला. अविनाश याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.