_MPC_DIR_MPU_III

Talegaon : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला फावड्याने मारहाण

A young man who tried to solve quarrel was beaten by shovel.

एमपीसी न्यूज – चुलत भाऊ आणि चुलत चुलते यांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला चुलत चुलता आणि त्याच्या दोन साथीदारांनी लोखंडी गज आणि फावड्याने मारहाण केली. यात तरुण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेआठ वाजता आढले खुर्द, घोटकुले वाडी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_IV

आकाश मारुती घोटकुले (वय 26, रा. आढले खुर्द, घोटकुले वाडी, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी हनुमंत शंकर घोटकुले (वय 40), सुखदेव शंकर घोटकुले (वय 32), सोमनाथ महादू घोटकुले (वय 34, सर्व रा. आढले खुर्द, घोटकुले वाडी, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादी आकाश घरी जेवण करत होते. त्यावेळी त्यांचा चुलत भाऊ मनीष राजू घोटकुले आणि त्यांचा चुलत चुलते आरोपी यांची भांडणे सुरु होती. जेवण करत असताना आकाश भांडणे सोडविण्यासाठी गेले.

आरोपींनी भांडणे सोडवत असल्याचा राग आकाशवर काढला. आरोपींनी आकाश यांच्या डाव्या हातावर लोखंडी गजाने मारले. तसेच फावड्याने व काठीने त्यांना मारहाण केली. यात आकाश जखमी झाले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.