Talavade: हरवलेल्या डुकरांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला कोयत्याने मारहाण

A young man who went to search for a lost pig was beaten with a scythe in talavade

एमपीसी न्यूज- हरवलेल्या डुकरांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला तीन जणांनी मिळून कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 30) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तळवडे येथे घडली.

महेंद्र रिडनाल (वय 24, रा. झेंडे मळा, देहूगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोन्या जाधव, नीलम जाधव, सोन्याभाऊ (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र यांनी त्यांच्या मालकीची 12 डुकरे दि. 12 मे रोजी चरण्यासाठी सोडली होती. डुकरे चरत असताना अचानक गायब झाली. त्यामुळे महेंद्र यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला.

मात्र त्यांची डुकरे महेंद्र यांना मिळून आली नाहीत. त्यानंतर शनिवारी दुपारी महेंद्र तळवडे परिसरात डुकरांचा शोध घेत होते. त्यावेळी ते संशयित आरोपी सोन्या याच्या घरी गेले. महिंद्र यांनी आरोपी सोन्याला ‘त्यांची डुकरे पाहिली का’ असे विचारले.

यावरून संशयित आरोपींनी आपसात संगनमत करून महेंद्र यांच्यावर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडक्याने व विटांनी मारहाण केली. यामध्ये महेंद्र गंभीर जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.