Crime News : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार

एमपीसी न्यूज – मित्रानेच लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर लैगिक अत्याचार केले, तसेच तिला इतरासी लग्न करण्यासही त्याने विरोध केला आहे.यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना 13 फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत घडली.

या प्रकरणी पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.16) तक्रार दिली असून प्रदिप केशव गित्ते (रा.बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांची सुरुवातील मैत्री होती.त्याचे प्रेमात रूपांतर झाले.पुढे आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.तसेच तिला दुसऱ्या सोबत आज अखेर लग्नही करु दिले नाही.यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.