Pune News : पुणे-सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड चौकातील अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे-सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड चौकात भरधाव वेगातील दुचाकी डिव्हायडरवर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. 21 जुलै रोजी हा अपघात घडला. प्रीतम दिलीप राव उडगे (वय 25, रा. आंबेजोगाई जिल्हा बीड) या तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप कुमार जगताप यांनी फिर्याद दिली असून दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलैच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रीतम उडगे हा दुचाकीने कात्रज वरून स्वारगेटच्या दिशेने जात होता. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आणि भरधाव वेगाने दुचाकी चालवत असताना त्याची दुचाकी सिटी प्राइड चौकातील डिव्हायडरला धडकले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने प्रीतमचा मृत्यू झाला. दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.