Ravet Crime News : दारुच्या धंद्याची पोलीस चौकीत तक्रार दिल्याने टोळक्याची युवकाला मारहाण

एमपीसी न्यूज – दारुचा धंदा पूर्णपणे बंद होण्यासाठी पोलीस चौकीत तक्रार दिल्याचा रागातून चार जणांच्या टोळक्याने एका युवकाला लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री साडेदहाच्या सुमारास रमाबाईनगर रावेत येथे घडली.

याप्रकरणी गंगाधर देवेंद्र नाटेकर (वय 22), दिपक वाल्मिक घनगाव (वय 23, दोघे रा. रमाबाईनगर, रावेत) यांना अटक केली. तर, त्यांचे साथीदार मोनेश देवेंद्र नाटेकर, रोहन वाल्मिक घनगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल अप्पा चंदु कदम (वय 31, रा. रावेत) याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी विशाल हा शनिवारी घराच्या बाजूला थांबला होता. त्यावेळी आरोपी मोनेश हा तिथे आला. मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून विशाल याला बाजूला नेले. विशाल याने आरोपी गंगाधर याचा दारुचा धंदा पूर्णपणे बंद होण्यासाठी पोलीस चौकीत तक्रार दिली होती. त्या रागातून आरोपी गंगाधर याने विशाल याच्या डोक्यात फरशी मारली. तर, आरोपी मोनेश याने लोखंडी गजाने विशालच्या डोक्यात, हातावर, पायावर मारहाण केली. आरोपी दिपक याने विशालच्या छातीवर दगड फेकून मारले. आरोपी रोहन याने शिवीगाळ करत हाताने मारहाण करत खुनाचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.