Pune News : पुण्यात कोयता खरेदीसाठी यापुढे आधारकार्ड बंधनकारक

एमपीसी न्यूज : गेल्या काही महिन्यांपासून पुणे (Pune News) शहर वाढत्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आलं आहे. संघटीत टोळ्यांची दहशत असतानाच आता पुण्यात कोयता गॅंग दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दिवसाढवळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकणारे तरुण हातात कोयते घेऊन पुण्याचा विविध भागात दहशत निर्माण करत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे आता कोयता गॅंगची दहशत मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी नवीन युक्ती लढवली आहे.यापुढे कोयता विकत घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला आधारकार्ड द्यावं लागणार.

पुणे शहर आसपासच्या परिसरात सुरुवातीपासूनच संघटीत टोळ्यांची नागरिकांत मोठी दहशत आहे. यावर पुणे पोलिसांनी या टोळ्यांमधील अनेक गुन्हेगारांविरोधात मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. ही कारवाई सुरु असतानाच पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे. अल्पवयीन मुलांचा या गॅंगमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असून त्यांच्यामार्फत अनेक ठिकाणी दहशत माजवली जात आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केल्यानंतर आता कोयता गँग पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

Kasba Peth Bye-Election : मतदारांनो, मतदार यादीतील नाव तपासून घ्या; निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

मात्र आता कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पुणे पोलिसांनी नवीन योजना आखली आहे.  या पुढे शहरात कुठेही कोयता घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला आधारकार्ड द्यावं लागणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.(Pune News) यासंदर्भात पुणे पोलिसांच्यावतीने शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येक कोयता विक्री खरेदी करणाऱ्याला आता आधार कार्ड द्यावं लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.