Pimpri : आकाश सोशल फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप 

एमपीसी न्यूज – पिंपरीतील आकाश सोशल फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील पूरबाधित नागरिकांसाठी औषधे, कपडे, अन्नधान्य अशा चीज वस्तूचे वाटप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिंदे यांच्या वतीने करण्यात आले. पूरग्रस्तांसाठी ”एक हात मदतीचा” हा उपक्रम फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. आकाश सोशल फाउंडेशनची सर्व टीम शिरोळमधील पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे काम करत आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगलीवर महापुराचं संकट कोसळलं आहे. लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत अश्यावेळी आपणच मदतीला धावून गेले पाहिजे. म्हणून आकाश सोशल फाउंडेशन पुरबाधित कुटुंबियांसाठी धावून गेली आहे. 

फाउंडेशनचे सुशांत खुरासने, राहुल सुहानी, बाबासाहेब बडे, सुरेश बोबडे, इमरान शेख, देवदास रांजने, अशोक वाघचौडे, अजिंक्य जैद, अमन जॉय, पप्पू यादव, कृष्णा मडिवाल, चंद्रकांत क्षीरसागर, सतीश सावरतकर, संदिप पाटील, गायकवाड सर, प्रताप सर, राजीव कोथाळे तसेच माय स्कायस्टारचे संपूर्ण टीम व पदाधिकारी या पुरबाधित नागरिकांच्या मदतीसाठी काम करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आकाश सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात पूर परिस्थिती खूपच भयंकर होती. यामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यावर अशा प्रकारचे संकट आले आहे, अशा संकटांचा सामना करण्यासाठी आकाश सोशल फाउंडेशन एका पायावर उभे राहून मदतीसाठी झटत राहील असा विश्वास शिंदे यांनी दिला. तसेच प्रत्येकाने पुढे येऊन आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे. या मदतीच्या आधारे पूरग्रस्त नागिरकांना आपला संसार पुन्हा उभा करण्यासाठी नक्कीच मायेचा आधार मिळेल असे मत आकाश शिंदे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, पूरग्रस्तांसाठी  फाउंडेशनच्या वतीने साडी, ब्लॅंकेट, लहान मुलांचे कपडे, टी शर्ट, पाणी बॉटल, तांदुळ, पोहे अशी सातशे पूरग्रस्त कुटुंबियांना फौंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.