Aakurdi : बांधकाम मजुरांसह जेष्ठांना किराणा साहित्याची मदत

एमपीसी न्यूज : लॉकडाउनच्या काळात घरी अडकून पडलेल्या बांधकाम मजूर व जेष्ठ नागरिकांना पोलीस नागरिक मित्र व जय आनंद पदयात्रा यांच्यावतीने 15 दिवस पुरेल इतके किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गोरगरीब नागरिकांना दोन वेळचे जेवण देण्यात आले.

सतत रोज  अत्यंत गरजू कुटुंबाला किरण वाटण्यात येतो.  या कामांमध्ये पोलीस नागरिक मित्रचे कार्यकर्ते वासुदेव काळसेकर, नितीन मोरे, विजय अबड, धनंजय आव्हाड, नकुल तळले, संजय प्रधान, खाकुर्डीकर, राजू भालेकर, रोहित स्वामी, संतोष शिंदे, लक्ष्मण शिंदे आदींनी या कामात मदत केली.

या वेळी टाटा मोटर्सचे व्यवस्थापक संजय चौधरी आणि बंडू काकडे, रेल्वे सल्लगार समिती सदस्य बशीर सुतार, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.