Aalandi : इंद्रायणी प्रदूषणाबाबत अण्णा हजारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार

एमपीसी न्यूज-दि.22 एप्रिल रोजी राळेगणसिद्धी येथे इंद्रायणी (Aalandi) सेवा फाउंडेशन व आळंदीतील  वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या वतीने इंद्रायणी नदी संवर्धनासाठी सद्यस्थितीत विविध मार्गाने होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आणि इंद्रायणी नदी बचाव व संवर्धनासाठी  शासनपातळीवर  दखल घेऊन तत्काळ कार्यवाही होण्यासाठी महाराष्ट्र दिन  1 मे रोजी होणाऱ्या साखळी उपोषणा बाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या शी चर्चा करून त्या संदर्भात त्यांना माहिती देण्यात आली.अण्णा हजारे यांनी  उपस्थितांना त्या संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच यावेळी  अण्णा म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी इंद्रायणी प्रदूषणा बाबत चर्चा करेल व तुम्हाला त्या संदर्भात कळवेन.

हे उपोषण इंद्रायणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे. आळंदीतील नागरिक व विविध संस्था संघटनेचे सहकार्य याला लाभणार आहे.असे यावेळी विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.

Aalandi : आळंदी नगरपरिषदेत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

 

इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे,शिरीष कारेकर,जनार्धन पितळे ,डॉ.वाघमारे,सामाजिक कार्यकर्त्या कोमल काळभोर ,ॲड.विलास काटे, वारकरी संप्रदायातील संदीप महाराज लोहर, संजय महाराज कावळे ,संतोषानंद  शास्त्री यांनी सद्यस्थितीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत अण्णांना माहिती सांगितली.

 

ती अशी की सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता इंद्रायणी नदी काठची गावे नदी पात्रात  सांडपाणी  थेट सोडत आहेत .तसेच   कारखान्यातील केमिकलयुक्त पाण्यावर ही कोणतीही प्रक्रिया न करता ते केमिकलयुक्त पाणी नदी पात्रात सोडत आहेत. तसेच विविध मार्गांनी ही इंद्रायणी नदीचे प्रदूषण होत आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे  याकडे लक्ष नाही.
यावेळी उपस्थितांनी अण्णांना ही माहिती दिली.उपस्थित मान्यवरांनी यावर उपाय सुचविताना, ते अण्णांना  म्हणाले  प्रत्येक इंद्रायणी नदी काठच्या  गावांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी  तेथील गावात  एस टी पी प्लांट उभारावा.तसेच प्रत्येक कारखान्यातील केमिकलयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कारखान्यात  एस टी पी प्लांट उभारावा.तसेच योग्य ती प्रक्रिया करून ते पाणी नदीपात्रात सोडण्यात यावे.इंद्रायणी परिक्रमा याबद्दल ही यावेळी माहिती देण्यात आली.
काही वर्षांपूर्वी सिध्दबेट दुरावस्थेत होते तिथे चला एक पाऊल सिध्दबेट अंतर्गत कसा बदल व विकास होत आहे याबाबत विठ्ठल शिंदे यांनी माहिती दिली.यावेळी आण्णा हजारे म्हणाले तिथे जनशक्ती मुळे तो बदल झाला (Aalandi) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.