Pune : मुदत संपण्यापूर्वीच त्या ‘पाच’ जणांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून आज गुरुवारी(दि.15) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पुण्यात 31 डिसेंबर 2017 ला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.एल्गार परिषदेच्या आयोजनासाठी माओवाद्यांकडून निधी पुरवला गेला असल्याच्या संशयावरून पाच जणांना अटक करण्यात आली होती.

सुरेंद्र गडलींग, शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपपत्र दाखल करण्यात पाचही जणांच्या अटकेला 3 सप्टेंबरला 90 दिवस पुर्ण होत असून त्यांना दोषारोपत्र दाखल न झाल्यास आरोपींना जामीन मिळू शकतो यामुळे त्या पाचही जणांविरूद्ध दोषारोपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढ मिळावी असा अर्ज करण्यात आला आला होता. व त्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देखील देण्यात आली होती. दोषारोपत्र दाखल करण्याची मुदत संपण्यापुर्वीच आज तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी त्या पाच जणांविरूद्ध दोषारोपपत्र सादर केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.