Pimpri: आम आदमी पार्टीचे उद्या राज्यभरात ‘वीजबिल माफ करा’ आंदोलन

Aam Aadmi Party's light bill waiver agitation across the state tomorrow

एमपीसी न्यूज- कोविड-19 च्या संकटामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थती बिकट बनली आहे. राज्यातील वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील प्रति महिना 200 युनिट पर्यंतची वीजबिले माफ करावीत ही मागणी घेऊन उद्या (दि.3) रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत आम आदमी पार्टीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील नागरिकांचा आर्थिक ताण त्वरित हलका करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत.

यासाठीच आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या वतीने राज्यातील वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील (एप्रिल ते जून) प्रत्त्येकी प्रति महिना 200 युनिट पर्यंतची वीजबिले माफ करावीत ही मागणी घेऊन उद्या दि. 3 जून रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

राज्यभर करण्यात येणाऱ्या या आंदोलनाद्वारे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडे ही मागणी पोहचवण्यात येणार आहे.

तसेच राज्यभरातील वीज ग्राहकांच्या भावना अधोरेखित करणारे व्हिडिओ प्रकाशित करून ते सोशल मीडियावरद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत.

या आंदोलनात आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी सामील होणार असून, गाव व शहर पातळीवरील सर्व वीज ग्राहक नागरिकांना वीज माफी आंदोलनात सामील करून घेतले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.