Bollywood Entertainment News : आमिर खानच्या लेकाचा होणार बॉलिवूडमध्ये डेब्यू !

0

एमपीसी न्युज :  बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात अनेक स्टारकिडचं पदार्पण झालं. या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या लेकाचं बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पुर्ण होणार आहे. जुनैद देखील येत्या काही काळात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जुनैद ‘इश्क’ या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या या चित्रपटाची पटकथा आणि कास्टिंगवर काम सुरु आहे. येत्या काळात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल.

जुनैदला अभिनयाची प्रचंड आवड आहे. सध्या तो जर्मनीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे. विशेषत: त्याला चित्रपटांऐवजी रंगभूमीवर काम करण्यात अधिक रस आहे. आजवर त्याने अनेक इंग्रजी आणि जर्मन भाषेतील नाटकांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच त्याला दिग्दर्शनाचीही त्याला आवड आहे. आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटात त्याने राजकुमार हिरानीसोबत सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी स्विकारली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.