AAP : आमदार लोगोचा गैरवापर; विनापरवाना लोगो लावणाऱ्या वाहन मालकांवर फौजदारी कारवाई करा
आम आदमी पार्टीची मागणी
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात (AAP) वाहनांवर विनापरवाना आमदार लोगो लावले जात आहेत. त्यामुळे विनापरवाना आमदार लोगो असलेले वाहन आणि वाहन मालकांवर फौजदारी कारवाई करावी करण्याची मागणी आम आदमी पार्टीने पोलिसांकडे केली आहे.
याबाबाब पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरात आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरातील नागरिकांना आणि आम्हा विद्यार्थ्यांना खरे आमदार कोण हे ओळखणे अवघड जात आहे. गाडीवर आमदार असे स्टिकर आणि काळ्या काचा लावून शेकडो गाड्या पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या थाटात फिरत आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.
Talawade : रुपीनगर येथे गॅलरीच्या खिडकीतून प्रवेश करत सव्वा लाखांची घरफोडी
शहरात असणारे लोकसभा सदस्य,राज्यसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य यांच्या अधिकृत वाहनांचे नंबर पिंपरी-चिंचवडकरांसाठी जाहीर करावेत. जेणेकरून खऱ्या आमदारांची गाडी ओळखणे सोपे होईल. ज्या खोट्या आमदारांनी गाडीवर अनधिकृत स्टिकर लावले गेले आहे अशांवर दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीचे सदस्य रविराज काळे यांनी केली (AAP) आहे.