Aapla Parivar Social Foundation : ‘प्लास्टिक मुक्त भारत देश माझा’ उपक्रमाअंतर्गत 10 हजार कापडी पिशव्यांचे वाटप

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी ‘आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे’ (Aapla Parivar Social Foundation) या संस्थेच्या वतीने प्लास्टिक मुक्त भारत अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील व पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 21 ठिकाणी एकाच वेळी एका तासात 10,000 कापडी पिशव्या मोफत वाटप करून शहरातील 10,000 कुटुंबांपर्यंत प्लास्टिक मुक्त भारत माझा…हा विचार पोहचवण्यात आला.

या उपक्रमाची सुरुवात आज सकाळी ध्वजारोहण करून प्रत्येक गटाने आपल्या भागातील गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, देशभक्तीपर व पर्यावरणपूरक घोषणा देत या कापडी पिशव्यांचे वाटप केले. यावेळी ‘प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, आपले शहर, स्वच्छ शहर, हरित शहर, सुंदर शहर, प्लास्टिक मुक्त भारत देश माझा असे संदेश छापलेल्या कापडी पिशवी मोफत वाटण्यात आल्या.

यानंतर प्रत्येक विभागातील स्वयंसेवकांचे क्रांतिवीर चाफेकर बंधू पुतळ्याजवळ चार वाजता आगमन झाले. तिथे मोठ्या उत्साहात क्रांतिवीरांना अभिवादन करत घोषणा देत मोरया गोसावी मंदिराजवळील जिजाऊ गार्डनपर्यंत, गांधी पेठ मार्गे रॅली काढण्यात आली. यावेळी ‌महिला व पुरुषांनी पांढराशुभ्र वेश परिधान करत हातात तिरंगा ध्वज व देशभक्तीपर, पर्यावरण वादी घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते. ही रॅली साडेचार वाजता जिजाऊ उद्यानात पोहोचली. या रॅलीमध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक सदस्यांनी सहभागी घेतला होता.

राष्ट्रगीत व प्लास्टिक मुक्त भारत देश माझा यावर आधारित गीताने कार्यक्रमाची (Aapla Parivar Social Foundation) सुरुवात झाली. यावेळी उपस्थितांनी तिरंगा ध्वज फडकवत या गाण्याला मोठ्या उत्साहाने दाद दिली. प्रमुख पाहुणे म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपला परिवार सोशल फाउंडेशन, पुणे या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष एस आर शिंदे यांनी उपस्थितीतांचे व पाहुण्यांचे स्वागत करुन संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली.

या अभिनव उपक्रमास खासदार श्रीरंग बारणे यांनी संबोधित करून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले व समाजाच्या हितासाठी असे उपक्रम आपला परिवार राबवत आहे. मी आपला परिवारचा एक घटक असल्याचा मला अभिमान आहे, असा उल्लेख केला. तसेच आपला परिवाराच्या वेगवेगळ्या पर्यावरण पूरक उपक्रमांमधून समाजाला एक वेगळी दिशा देण्याचे काम होत आहे. यापुढेही या आपला परिवाराचे कार्य अखंड महाराष्ट्रला दिशादर्शक असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार यांना आपला परिवारच्या वतीने प्रभाकर ढोमसे यांनीही पर्यावरण पूरक कापडी पिशवी भेट दिली. या उपक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, जुन्नर तालुका मित्र मंडळ पुणे, रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, अलायन्स क्लब यांसह समाजसेवी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आपला परिवाराच्या सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली.

मागील पाच वर्षांपासून ‘आपला परिवार सोशल फाउंडेशन पुणे’ या नावाने स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहराबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात सुपरीचित आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील विविध क्षेत्रातील 108 कुटूंब एकत्र येऊन ‘आपला परिवार’ या नावाने या पर्यावरणवादी सामाजिक संस्थेची ओळख झाली आहे. या परिवाराने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. एकूणच वर्षभरात मकरसंक्रांत, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व संवर्धन आणि एक हात मदतीचा असे समाजपयोगी उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

या वर्षी स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने एक खारीचा वाटा म्हणून ‘प्लास्टिक मुक्त भारत देश माझा…’ करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी आपल्या पुर्ण शहराच्या व जिल्ह्यातील विविध 21 ठिकाणी फक्त एक तासात 10,000 कापडी पिशव्या मोफत वाटण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कापडी पिशव्या बनविण्याची संकल्पना ही नाविन्यपूर्ण असून टाकाऊपासून टिकाऊ अशी आहे. महिलांच्या घरातील 1100 जुन्या साड्या व वीस हजार ब्लाऊज पीस जमा करून त्यापासून‌ या दहा हजार कापडी पिशव्या (Aapla Parivar Social Foundation) बनविण्यात आल्या.

Independence Day : देश सार्वभौम आहे, परंतु जनता नाही – डॉ. सुरेश बेरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.