Arya Samaj : आर्य समाजाची प्रभात फेरी उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने 15 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड (Arya Samaj) शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. दत्ता सूर्यवंशी (अध्यक्ष आर्यवीर दल, पुणे जिल्हा) यांनी सांगितले, की ही टू व्हिलर प्रभात फेरी सकाळी 6.30 वाजता आर्य समाज भवन पिंपरी येथून निघाली. या प्रभात फेरीत आर्य समाजाचे सभासद, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.

प्रभात फेरी पिंपरी गाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ थांबून त्यांना अभिवादन केले. पुढे ती फेरी चिंचवडगावातील चाफेकर चौकात चाफेकर पुतळ्याजवळ थांबून त्यांना अभिवादन केले. पुढे जाऊन चिंचवड स्टेशन येथील वासुदेव बळवंत फडके व लहुजी वस्ताद स्मारक येथील त्यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

नंतर ती फेरी चिंचवड येथील के एस बी चौकात पोहचून तेथील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ही पुढे जाऊन पुणे मुंबई महामार्गावरील फिनोलेक्स चौका जवळील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. पुढे जाऊन ही फेरी भारतरत्न बाबासाहब आंबेडकर स्मारक चौक येथे पोहचून तेथील बाबासाहब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या प्रभात फेरीचा समारोप पिंपरीमधील (Arya Samaj) आर्य समाज येथे झाला.

Aapla Parivar Social Foundation : ‘प्लास्टिक मुक्त भारत देश माझा’ उपक्रमाअंतर्गत 10 हजार कापडी पिशव्यांचे वाटप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.