Assam : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये बंद आणि जाळपोळ

एमपीसी न्यूज – नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये बंद पाळण्यात येत असून मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली जात आहे. काल लोकसभेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी 311 विरुद्ध 80 अशा फरकाने हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. मात्र, हे विधेयक केवळ राजकीय फायद्यासाठी आणि मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आणण्यात आले आहे, असा आरोप विरोधकांनी केला व या विधेयकाला कडाडून विरोध केला.

तरीही नागरिकत्व दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज देशभरात ठिकठिकाणी त्याला विरोध होत आहे. आसाममध्ये विधेयकावरून जोरदार विरोध पाहायला मिळत असून बंद पाळला आहे. आसाममध्ये ‘नो कॅब’ हे स्लोगन रस्त्यांवर भितींवर पाहायला मिळत आहे. विधेयकाविरोधात १६ संघटना सहभागी झाल्या असून आसामबरोबरच लखनऊमध्येही त्याचा विरोध करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.