ABBM Idol Competition 2022 : एबीबीएम आयडॉल स्पर्धकांनी नृत्य, गायन, वादनाने गाजवली स्पर्धा

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पौड रोड शाखा व कला संस्कृती आघाडी तर्फे एबीबीएम आयडॉल स्पर्धा 2022 (ABBM Idol Competition 2022) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 40 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेत गायन, नृत्य व व्हायोलीन वादनाने स्पर्धेत रंगत भरली.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद जी. कुलकर्णी, लक्ष्मीकांत धडफळे, वृषाली शेकदार, विजय शेकदार, सचिन टापरे, माधव तिळगूळकर, सुनील शिरगांवकर, राहुल जोशी, शैला सोमण, ऋचा व अमोघ पाठक उपास्थित होते. सुमारे 3 तास चाललेल्या स्पर्धेचे परीक्षण, प्रसिद्ध सिने नाट्य कलाकार आनंद पानसे, संजय गोगटे, प्रसिद्ध गायिका माधवी दिवेकर, सत्यवान सावित्री या गाजलेल्या मालिकेतील सावित्री म्हणजे वेदांगी कुलकर्णी -तिळगूळकर, यांनी परिक्षण केले.

या स्पर्धेची विजेती म्हणून नृत्य सादर करत मधुरा फाटक हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर अनन्या जोगळेकर हिने गायन करत द्वितीय क्रमांक, अनुराधा सोहोनी हिने तृतीय क्रमांक पटकावला. या शिवाय विवेक वनगे याने व्हायोलीन वादन तर पल्लवी अनिखिंडी हिने गायन सादर (ABBM Idol Competition 2022) करत उत्तेजनार्थ बक्षिसे पटकावली

MPC News Quiz 1 : ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा – दिवस पहिला….जिंका भगवती ज्वेलर्सच्या वतीने चांदीचा करंडा

यावेळी जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन पौड शाखा अध्यक्ष विवेक खिरवडकर, उदय सुभेदार, रवींद्र रानडे, मंजुश्री खिरवडकर, सीमा रानडे,योगेश देव, चैतन्य देव, प्राजक्ता जोगळेकर, नीलिमा पानसे यांनी केले. तर दीपा केळकर यांनी निवेदन केले, प्रदीप रत्नपारखे यांनी आभार मानले. तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शक अशोक प्रभुणे, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.