Pune : वनपालास दहा हजारांची लाच स्वीकारताना एबीसीच्या पथकाने पकडले रंगेहाथ

एमपीसी न्यूज – शस्त्राचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 10 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या दौंड येथील वनपालास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बुधवारी(दि.31) सापळा रचून शिवाजीनगर येथे रंगेहाथ पकडले.

समाधान मुरलीधर पाटील(वय 32) असे लाच स्वीकारणाऱ्या वनपालाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने शस्त्र परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता. वनविभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र तक्रारदार यांना देण्यासाठी दौंड येथील वनपाल समाधान पाटील यांनी त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. याची तक्रार अर्जदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली.त्याप्रमाणे आज एबीसी च्या पथकाने सापळा रचून वास्तू अपार्टमेंट शिवाजीनगर दौंड पुणे कार्यालयात लाच स्वीकारताच रंगेहाथ पकडले.वनपाल समाधान पाटील यांच्यावर दौंड पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.