Wakad : अपह्रत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोलीस तपासादरम्यान प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – अपहृत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. काळेवाडी येथे 2019 मध्ये दिवाळीच्या दिवशी हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी 59 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल वाघचौरे (वय 22, रा. लांडेवस्ती, भोसरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दिली होती. त्यानुसार चिखली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास करीत असताना पीडित मुलीने याबाबत माहिती दिली. आरोपी अनिल वाघचौरे याने गेल्या वर्षी 2019 मध्ये दिवाळीच्या दिवशी पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीच्या काळेवाडी येथील घरी बोलावले. तेथे आरोपी याने जबरदस्तीने पीडित मुलीवर अत्याचार केला. पोलीस तपासादरम्यान ही बाब समोर आली असून, त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.