Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग शहर उपाध्यक्षपदी अब्दुल रज्जाक मुल्ला यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्ष पदावर अब्दुल रज्जाक मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिले.

पक्षाने दिलेली जबाबदारी पुढील काळात निष्ठेने पार पडण्याची तसेच पक्षाची ध्येय धोरणे समाजातील सर्व घटकांमध्ये पोहोचविण्यासाठी भरीव काम करण्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. पक्षाची ध्येय धोरणे समाजातील सर्व स्तरांवर पोहोचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अब्दुल रज्जाक मुल्ला म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. शहर सरचिटणीस जिलानी सय्यद, सरचिटणीस एजाज बागवान, सरचिटणीस अल्ताफ शेख, उपाध्यक्ष अब्दुल रज्जाक मुल्ला, उपाध्यक्ष सलिम सय्यद, उपाध्यक्ष किसन चावरीया, शहर संघटक मुर्तजा चौधरी, शहर संपर्क प्रमुख मोहम्मद आसिफ शेख, शहर महिला अध्यक्षा रशिदा खान, महिला कार्याध्यक्षा श्रीमती वर्षा, महिला सरचिटणीस नसरीन शेख, महिला उपाध्यक्षा हुरबानो पठाण, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अभिषेक कांबळे, कासारवाडी प्रभाग अध्यक्ष जनाब ईसाक नागूर आदींची नियुक्ती करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.