Chinchwad News : ‘अभाविप’चे 55 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन 6 व 7 फेब्रुवारीला चिंचवडमध्ये 

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन 6 व 7 फेब्रुवारीला चिंचवडमध्ये प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर करणार आहेत. अशी माहिती स्वागत समितीचे सचिव ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी दिली.

अभिवपच्या स्थापनेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन’ होत आहे‌‌. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘राष्ट्रीय शिक्षा नीती’ हे या अधिवेशनाचे प्रमुख विषय आहेत.

अधिवेशनाच्या स्वागत समिती अध्यक्षपदी मराठा काॅमर्स ऑफ चेंबर्सचे अध्यक्ष सुधीर मेहेता असतील तर, बालाजी शैक्षणिक संस्थेचे संचालक परम बालसुब्रमन्यम् हे उपाध्यक्ष तसेच ॲड. मोरेश्वर शेडगे हे सचिव असतील. महापौर उषा ढोरे यांच्यासह समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती स्वागत समितीचे सदस्य असतील. यात स्वागत समिती संरक्षक गिरीश प्रभुणे तर, व्यवस्था प्रमुख कृष्णा भंडलकर असतील.

‘उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड शहराची आता शैक्षणिक नगरी म्हणून नवीन ओळख होऊ पहात आहे. त्यामुळे अभाविपचे प्रदेश अधिवेशन विद्यार्थी जडणघडणीत मोलाचे ठरेल. असे, स्वागत समितीचे सचिव ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.