Pimpri : जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी ‘अभया ते निर्भया’ परिसंवाद

दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांचा उपक्रम; योगेश मालखरे यांचा विशेष सत्कार

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभया ते निर्भया’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस, विधी, लेखन, प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांशी हा संवाद होणार आहे. या कार्यक्रमात निराधारांचा आधार असलेले योगेश मालखरे यांचा सत्कार होणार आहे. रविवारी (दि. 8) दुपारी साडेचार वाजता ज्ञान प्रबोधिनी विद्यालय, प्राधिकरण येथील मनोहर वाढोकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक स्मिता जोशी, लेखिका आश्लेषा महाजन राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया राहाटकर, कौटुंबिक समुपदेशक डॉ. सागर पाठक यांच्याशी हा परिसंवाद होणार आहे. आदित्य दवणे हे या परिसंवादाचे सूत्रसंचालक असणार आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त तसेच सामाजिक बांधिलकीच्या जणिवेतून दुर्गेश्वर मित्र मंडळ व अनुष्का स्त्री कला मंच यांच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी संपूर्ण देशात ज्वलंत असणा-या निर्भया या विषयावर परिसंवाद आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योती कानेटकर आणि मैत्रिणी ‘अभया ते निर्भया वेगळा दृष्टिकोन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सिद्धी देवा म्युझिक आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने भावगाणी सादर होणार आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त ‘अभया ते निर्भया’ या विषयवार घोषवाक्य (स्लोगन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या संदर्भातील स्थित्यंतरांबाबत शब्दातून व्यक्त होता येणार आहे. तीन गटातून बक्षिसे दिली जाणार आहेत. 18 ते 25, 26 ते 50 आणि 50 च्या पुढील या प्रत्येक गटातून तीन व्यक्तींना बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी 7057574272 / 9766337414 या क्रमांकावर आपले घोषवाक्य टाईप करून पाठवावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दुर्गेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक अमित गावडे, अनुष्का स्त्री कला मंचच्या अध्यक्षा शर्मिला महाजन, विनिता देशपांडे, गीता कदम, मंजुषा देशपांडे, दीपा चिरपुटकर, वृंदा गोसावी, हिमाली प्रधान, अनुजा दोषी, सुनंदा सुपनेकर, समृद्धी पैठणकर, शामल जम्मा, अरुषा शिंदे, उषा गर्भे, स्वाती धर्माधिकारी, सुरेखा भालेराव, स्नेहल भिंगरकर, ज्योती देशमुख, डॉ. माधवी महाजन यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.