Satara News: अभिजीत बिचुकले यांचे मतदार यादीतून नावच गायब!

एमपीसी न्यूज : पुणे पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना मतदानाआधीच धक्का बसला आहे. बिचुकले यांचे मतदार यादीतून नावच गायब झाले आहे. यामुळे बिचुकले यांनी भाजपासह प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला आहे.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुणे पदवीधर मतदार संघातून अपक्ष उमेदार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. मतदार यादीत बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांचे नाव होते.

_MPC_DIR_MPU_II

पण त्यांच्या नावाखाली अभिजीत यांचे नाव नसून नारायण बिचुकले असे दुसऱ्याच व्यक्तीचे नाव होते. हे पाहून अभिजीत बिचुकले यांना राग अनावर झाला. त्यांनी बूथवरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

या संदर्भात बिचुकले म्हणाले, मी उमेदवार असून माझे नाव यादीत नाही, तर सर्वसामान्याचे काय? कोणीही येऊन इथे मतदान करेल. सर्व आपले बंधूभाव आहेत. मी कधीही जातीवर राजकारण केले नाही. यांनी स्वत:ची नाव लिहीली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोचे नाव आहे. पण माझे नाही. मी उमेदवार आहे. त्यामुळे मला मतदानापासून आता वंचित राहावे लागणार आहे. हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे. निवडणूक आयोग अशाच प्रकारे जर काम करणार असेल तर सगळ अवघड असल्याचेही यावेळी म्हणाले.

अभिजीत बिचुकले यांनी यावेळी भाजपवर खापर फोडले आहे. निवडणूक आयोग नेमका कसा फॉलोअप घेत होते याची मला माहिती नाही. पण यात काहीतरी षडयंत्र आहे. उमेदवाराचे नाव नसणे हा भोंगळ कारभार नाही का? यामागे कोणता पक्ष आहे, हे शोधले पाहिजे, भाजपने या सगळ्या याद्या बनवल्या आहेत, असा थेट आरोप बिचुकले यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1