Abhishek Bachchan discharged from hospital:अभिषेकने केली करोनावर यशस्वीपणे मात

एमपीसी न्यूज – महानायक अमिताभ बच्चन यांच्या बरोबर त्यांचा मुलगा बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचीदेखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तो नानावटी रुग्णालयात ट्रीटमेंट घेत होता. आज अभिषेकचा करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सर्वप्रथम अमिताभ यांच्या सोबत अभिषेकची देखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी घरातील इतरांची टेस्ट निगेटिव्ह होती. पण काही दिवसांनी ऐश्वर्या आणि आराध्या यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्या दोघी देखील रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

उपचारांनंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले, त्यानंतर बिग बी अमिताभ यांना देखील घरी सोडण्यात आले. मात्र अभिषेक नानावटी रुग्णालयातच उपचार घेत होता.

अखेर 28 दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली असून त्यांचे आभार मानले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

‘एक वचन हे एक वचनच असतं. आज माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं मी करोनावर मात करेन. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांची केलेल्या काळजीसाठी मनापासून धन्यवाद. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून त्यांचे आभार’, असं ट्विट अभिषेकने केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.