Kasarwadi : धावत्या पीएमपीएमएल बसचा टायर पेटला

प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

एमपीसी न्यूज – धावत्या पीएमपीएमएल बसच्या टायरने अचानक पेट घेतला. मात्र, यात प्रसांगवधान राखत प्रवाशाने वेळीच बसचालकाला याबाबत माहिती दिली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना नाशिक फाटा येथे आज (बुधवारी) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली.

याबाबत अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागेश भाले यांनी पिंपरी अग्निशामक दलाला माहिती दिली. बस (एमएच 12 / एचबी 1317) चिखलीवरून मनपा भवनकडे जात होती. या बसमध्ये सुमारे 35 प्रवाशी प्रवास करीत होते. यावेळी बसच्या पाठीमागच्या टायरच्या ड्रममध्ये ऑइल सील खराब झाल्यामुळे ऑइल लिकेज झाले होते. त्यामुळे लायनर गरम होऊन क्लिनर साईडचे मागचे चाक पेटले. याची माहिती एका प्रवाशाने चालकाला तात्काळ पुढे जाऊन दिली. चालकाने बस बाजूला घेऊन प्रवाशांना खाली उतरवले. संत तुकाराम अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तात्काळ आग नियंत्रणात आणण्यात आली. सब ऑफिसर अशोक कानडे, फायरमन सरोष फुंडे, अमोल चिपळूणकर, अक्षय पाटील, दादासाहेब मोरे, शिवाजी चेडे, अभिजीत मवारे यांच्या पथकाने ही आग विझवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.