About MPCNEWS

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील हे पहिले सिटी न्यूज पोर्टल 22 जुलैै 2008 पासून आपल्या सेवेत कार्यरत आहे. पत्रकारांनी सुरू केलेले आणि चालविलेले हे सिटी न्यूज पोर्टल एमपीसी न्यूज प्रा. लि. च्या मालकीचे आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड, मुळशी परिसरातील स्थानिक घडामोडींचा वेध या न्यूज पोर्टलद्वारे घेण्यात येतो.
निर्भिड, निष्पक्षपाती आणि विश्वासार्ह पत्रकारिता करीत एमपीसी न्यूजच्या टीमने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नाही तर समर्थपणे पेलले आहे. जगभरातून 46 लाखांहून अधिक युनिक व्हिजिटर्सनी गेल्या 11 वर्षांत कोट्यवधी व्हिजिट्स दिल्याचे ‘गुगल अॅनॅलिटिक्स’ वरून पहायला मिळते. त्यामुळे शहराच्या ग्लोबल नेटवर्किंगमध्ये एमपीसी न्यूजने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
एमपीसी न्यूजने मोबाईल क्रांतीनंतरची गरज लक्षात घेऊन एसएमएस न्यूज अलर्ट्स सेवा सुरू केली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत फेसबुक पेज, व्हॉट्सअॅप बुलेटीन, ट्विटर, यूट्यूबच्या माध्यमातून शहरातील ताज्या घडामोडींबाबत जगाला अपडेट ठेवण्याची कामगिरी केली. बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन स्थानिक बातम्या देणारे एमपीसी न्यूज हे शहरातील पहिले मोबाईल अॅप्लिकेशन सुरू करण्याचा मानही आम्हाला मिळाला. आठ मार्च 2018 पासून आम्ही दररोज सकाळी ताज्या बातम्या देणारे ऑडिओ बुलेटीन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्यास सुरूवात केल्यामुळे बातम्यांचे श्रवण करण्याचा आनंदही आमच्या श्रोत्यांना उपलब्ध झाला आहे. फेसबुकवरील अपडेट्स प्रमाणे आम्ही व्हॉट्सअॅपचे ग्रुप बनवून हजारो दर्शकांना अपडेट ठेवण्याचे काम करतो.
हाडाच्या पत्रकारांनी सर्वसामान्यांसाठी सिटी न्यूज पोर्टल चालविण्याच्या या प्रयोगाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. एमपीसी न्यूज हे मंथन राष्ट्रीय पारितोषिक विजेते शहरातील एकमेव सिटी न्यूज पोर्टल आहे, ही बाबही अभिमानास्पद आहे.

संपादक

विवेक इनामदार

कार्यकारी संपादक

हृषीकेश तपशाळकर

सहयोगी संपादक

अनिल कातळे

पिंपरी कार्यालय

एमपीसी न्यूज प्रा. लि.

31, भक्ती कॉम्प्लेक्स, डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या मागे,

हॉटेल अल्पाईनच्या शेजारी, खराळवाडी, पिंपरी, पुणे – 411018

चिंचवड कार्यालय

एमपीसी न्यूज प्रा. लि.

दुसरा मजला, गावडे इस्टेट, हॉटेल ‘रागा थाळी’च्या वर,

पुणे-मुंबई महामार्ग, चिंचवड स्टेशन चौक, पुणे – 19

पुणे कार्यालय

एमपीसी न्यूज प्रा. लि.

द्वारा – भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, फ्लॅट नं 7.

पहिला मजला, भूपती कॉम्प्लेक्स, ज्ञानप्रबोधिनी शाळेसमोर, 986, सदाशिव पेठ, पुणे – 30

बातम्यांसाठी संपर्क
मोबाईल क्र. 9011050005
व्हॉट्सअॅप नं. 9011050002
ई-मेल [email protected]

जाहिरातीबाबत संपर्क

अनुप – 9011080006

ई-मेल – [email protected]