Abusing and threatening for planting poles : जमिनीवर प्लॉटींगसाठी खांब रोवले म्हणून शिवीगाळ व धमकी

एमपीसी न्यूज – सरकारी मोजणी शिवाय तुम्ही जमिनीवर खांब रोवता येणार नाहीत म्हणून एकला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार आंबेठाण, चाकण येथे सोमवारी (दि.3) दुपारी अडीच च्या सुमारास घडला आहे.
अनिल बळवंत (वय 42 रा.आंबेठाण) यांनी फिर्याद दिली असून काळुराम दगडु घावटे, अर्जुन दगडु घावटे व एक महिला आरोपी सर्व राहणार आंबेठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ रामचंद्र पडवळ हे सरकारी मोजणीनुसार जमीन गट 26 येथे सिमेवर सिमेंटचे खांब रोवत असताना आरोपी तेथे आल. त्यांनी या जमिनीची अद्याप सरकारी मोजणी झाली नाही, ही आमची जमीन आहे, सरकारी मोजणीनंतर खांब रोवा म्हणत फिर्यादी यांना शिवीगाल करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांच्यावर दगडफेक करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.