ACB action : एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक व वकीलाला अटक

एमपीसी न्यूज : दाखल गुन्ह्याचा ब फायनल करतो म्हणत एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जुन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व वकिलाला रंगेहात पकडले आहे.(ACB action) ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.1) केली आहे.

अमोल साहेबराव पाटील (वय 32) हा जुन्नर पोलीस ठाणे येथे पोलीस उपविरीक्षक या पदावर काम करत होता तर केतन अशोक पडवळ हा वकील आहे. (ACB action) दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून न्यालयाने दोघांनाही 4 ऑक्टोबर पर्यंत पोलीसकोठडी सुनावली आहे.जुन्नर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hackathon competition : स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईआर महाविद्यालयाचे घवघवीत यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा ब फायनल करण्यास मदत करतो असे सांगत पाटील व पडवळ याने फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार सापळा रचून लाचलुचपत विभागाने आरोपींना अटक केले. (ACB action) याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.