Pune Crime News : दहा हजारांची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – बारामती तालुक्यातील एका तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. ही कारवाई आज (बुधवारी, दि. 17) करण्यात आली.

मधुकर मारुती खोमणे (वय 58) असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. खोमणे हे बारामती तालुक्यातील निंबुत सजा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत, याप्रकरणी 48 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचे क्षेत्र दुरुस्ती नोंद करायचे होते. जमिनीचे क्षेत्र दुरुस्ती नोंद करण्यासाठी खोमणे याने तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

एसीबीने सापळा लावून बुधवारी खोमणे याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप व-हाडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.