Pune : वनविभागाच्या महिला अधिका-यास 65 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज – वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यास आज शुक्रवारी (दि.26) 65 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले. 

गीता पवार असे लाच स्वीकारणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे सरकारी ठेकेदार असून त्यांना पाटबंधारे विभागाची पाईपलाईन टाकण्याचे काम मिळाले आहे. हे काम चालू असताना टाकलेली पाईपलाईन ही वनखात्याच्या जमिनीमध्ये असल्याने तक्रारदार यांच्यावर वन कायद्याअंतर्गत कारवाई करून साहित्य व ट्रॅक्टर जमा करण्यात आला. हे साहीत्य सोडवण्यासाठी वन कायद्याचे तपासी अधिकारी गीता पवार यांनी तक्रारदाराकडे 70 हजारांची लाच मागितली.

ही बाब तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली असता आज शुक्रवारी (दि.26) गीता पवार यांच्यावर सापळा कारवाई करून त्यांनी ताडजोडीअंती 65 हजारांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहाथ पकडले. चतुःश्रूंगी पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.