Pune : जीएसटी विभागातील राज्य कर विक्री अधिकारी एक लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पुण्याच्या वस्तू व सेवा कर विभागातील राज्य कर विक्री वर्ग दोनच्या अधिका-याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज बुधवारी (दि.29) करण्यात आली. 

रामकृष्ण यादव माने (वय 45, रा. बीटी कवडे रोड, पुणे), असे या अधिका-याचे नाव आहे.

तक्रारदार यांची सप्लायिंग करण्याची कंपनी आहे. कंपनीला फॉर्म नंबर 318 अन्वये पाठविलेली नोटीस काढून घेण्यासाठी आणि तक्रारदार यांची गोठवलेली बँक खाती पुन्हा सुरू करण्यासाठी अधिकारी माने याने तक्रारदारांकडे दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती एक लाख रुपये देण्याचे ठरले.

याविषयी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार सापळा रचून जीएसटी कार्यालय येरवडा येथील आलोसे कार्यालयात एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना अधिकारी माने याला रंगेहाथ पकडले.

या कारवाईत एसीबी पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे, अर्चना दौंडकर, पोलीस हवालदार टिळेकर, पोलीस नाईक गोसावी, पोलीस शिपाई कादबाने, ड्रायव्हर माळी आदींनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.