Pimpri : भाजपमध्ये प्रवेश देणे आहे, ईडी व ‘इन्कम टॅक्‍स’ची नोटिस आलेल्यांना प्राधान्य; पिंपरीत झळकला फलक

भाजपची खिल्ली उडविली 

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते, आमदार, पदाधिकारी घाऊक पद्धतीने सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तपास यंत्रणांचा भीती दाखवून, त्रास देऊन दाखवून विरोधकांना पक्षांतर करण्यास भाग पडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला होता. त्यांनतर आज सोमवारी पिंपरी चौकात भाजपची खिल्ली उडविणारा फलक लावला आहे. भाजपमध्ये प्रवेश देणे आहे, ईडी व ‘इन्कम टॅक्‍स’ची नोटिस आलेल्यांना प्राधान्य असेल असा मजकूर फलकावर आहे. दरम्यान, फलक कोणी लावला हे समजू शकले नाही. 

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात हा फलक झळकला आहे. भाजपात प्रवेश देणे आहे. ईडी व ‘इन्कम टॅक्‍स’ची नोटिस आलेल्यांना प्राधान्य असेल. भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती. सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा.

_MPC_DIR_MPU_II

टीप- विचारधारेची कोणतेही अट नाही. आमच्याकडे जागा फुल झाल्यास मित्र शाखेत अडजेस्ट करता येईल, असे फलकावर लिहिले आहे.

प्रवेशासाठी फलकावर खाली एक नंबरही दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.