Pune : गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. 26 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता घडली.

सुनील तारू (वय 60, रा. खैरेवाडी), असे मयताचे नाव असून सुनील यांचे भाऊ अविनाश तारू यांनी याप्रकरणी चतुःश्रूंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हे 26 एप्रिलला सकाळी नऊ वाजता गणेश खिंड रोड येथून पायी रस्ता ओलांडत होते. यावेळी कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, वाहनचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता, अपघाताची खबर न देता पळून गेला. चतुःश्रूंगी पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.