Accident : उर्से टोल नाक्याजवळ पहाटेच्या सुमारास कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज-मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ ( Accident) आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका कारचा भिषण अपघात झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले असून एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.
PCMC : थेरगाव रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ मनोज भावसार यांचे अपघाती निधन
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याकडे जाणार्या लेनवर रस्त्याच्या कडेला एक आयशर टेम्पो क्र. (MH 12 TV 5039) हा उभा होता. त्याला वेगात असलेली कार क्र. (MH 12 NJ 2419) ची जोरात धडक बसल्याने हा अपघात झाला. धडक एवढी जोरात होती की कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
कार मध्ये सहा जण होते. त्यापैकी एका मुलीचा जागीचा मृत्यू झाला. इतर जखमींना आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले ( Accident) आहे.