Accident: टायर फुटून कार नाल्यात उलटली, पोलीस अधिकारी जागीच ठार

Accident: Car overturned in Nala due to tire burst, police officer killed on the spot भरधाव टोयोटा कारच्या समोरच्या बाजूचे टायर फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटून कार महामार्गालगतच्या झाडावर आदळून नाल्यात उलटली.

एमपीसी न्यूज- कारच्या समोरच्या बाजूचे टायर फुटून नियंत्रण सुटल्याने कार महामार्गालगतच्या नाल्यात उलटून झालेल्या अपघातात अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातील वडाळीभोई येथील मुंबई-आग्रा महामार्गावर घडला.

राजेंद्र वामन ससाणे (56, रा. तरणतलाव, नाशिक रोड) असे मृत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. ते नाशिक येथील आपल्या घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

ससाणे हे दोन दिवसांची सुटी घेऊन अमळनेरहून नाशिकमधील आपल्या घराकडे निघाले होते. दुपारच्या सुमारास वडाळीभोई येथे आल्यानंतर त्यांच्या भरधाव टोयोटा कारच्या समोरच्या बाजूचे टायर फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटून कार महामार्गालगतच्या झाडावर आदळून नाल्यात उलटली.

ससाणे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नाशिकच्या पोलिस अधीक्षक आरती सिंह यांनी तात्काळ भेट दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.