Accident News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारचा विचीत्र अपघात, डिव्हायडरचा रॉड कारच्या आरपार

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील सोमाटणे फाटा (Accident News) येथे  आज (शनिवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास कारचा एक विचीत्र अपघात झाला आहे. यामध्य़े रस्ता दुभाजकाचा रॉड कारच्या आरपार गेला आहे.  सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. मात्र बघणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता.

 

 

Vadgaon Maval : गॅस सिलेंडर घरपोच देण्याची मागणी

 

 

 मुंबईवरुन सोमाटण्याकडे वळताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला अन् गाडी थेट अशा पद्धतीने डिव्हाईडरमध्ये घुसली. या कारमधून चालक आणि दोन प्रवासी महिला असे एकूण तीन जण प्रवास करत होते. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.या अपघातात एका प्रवाशाला गंभीर इजा झाली आहे, त्या प्रवाशाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

 

दोन दिवसात दोन अपघात

दरम्यान काल (17 मार्च) याच परिसरात कारने ट्रकला मागून धडक दिली होती. या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. ही कार मुंबईहून पुण्याकडे जात होती. उर्से टोल नाक्याजवळ कार ने ट्रकला मागून (Accident News) जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.महामार्गावरील वेग हा सध्या जिवघेणा ठरत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.