Talegaon News : भाड्याने प्रवाशांची ने-आण करणाऱ्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात

एमपीसी न्यूज – भाड्याने प्रवाशांची ने-आण करणाऱ्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमाटने फाटा येथे अपघात झाला. यात कार चालक आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी घडली.

कारचालक नावेद अली मुन्नावर शेख (वय 23, रा. घाटकोपर, मुंबई), इरफान शमशुद्दीन सरदार (वय 40), मोहम्मद जावेद खान रुआब अली खान (वय 29, दोघे रा. मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत रवीतेजा सत्यनारायण तविटीकी (वय 28, रा. वरळी, मुंबई) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक नावेद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नावेद याने त्याच्या कारमध्ये (एम एच 04 / के डी 8958) भाड्याने प्रवासी भरले. प्रवाशांची मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून वाहतूक केली. सोमाटणे फाटा येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कारचालक नावेद याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. कार पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला पडली. यामध्ये कार चालक आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.