Lohgad news: लोहगड जवळील दुधीवरे खिंडीमध्ये पेण येथील एका क्लासची सहलीची बस दरीत पडून अपघात

एमपीसी न्युज : लोहगड जवळील दुधीवरे खिंडीमध्ये पेण येथील एका क्लासच्या सहलीची बस दरीत पडून अपघात झाल्याची घटना आज रविवार 4 डिसेंबर रोजी घडली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती देताना, सचिन भोर्डे, पोलीस पाटील लोहगाव म्हणाले की आर्या क्लासेस, पेण यांच्या बसला अपघात झाला आहे. आर्या क्लासेस, पेण यांचे 4 बस मधून विद्यार्थी व शिक्षक असे एकूण 90 जण सहलीसाठी आज सकाळी लोहगड किल्ला पाहण्यासाठी आले होते.

किल्ला पाहिल्यानंतर दुपारी ते परत पहिला जाण्यासाठी निघाले होते. चार वेळेस पैकी तीन बस पुढे व्यवस्थित गेल्या. पण शेवटची चौथी बस दुधीवरमधून जात असताना 150 ते 200 फूट खोल दरीत पडल्याने आज आज दुपारी तीन वाजता सुमारास अपघात झाला आहे.

Pimpale Saudagar: पिंपरी चिंचवड थायबॉक्सिंग चँपियनशिपचे उदघाटन

अपघातग्रस्त बस मधून 27 जण प्रवास करत होते प्रवास करत होते. बस खाली दरीत पडल्यानंतर उलटली आहे. बस मधून सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे व एकही विद्यार्थी जखमी झाला नाही. या बस मधून प्रवास करणारी चार ते पाच शिक्षक जखमी झाले आहेत. त्यांना लोणावळा व सोमाटणे फाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे

शिवदुर्ग लोणावळा यांची टीम व लोहगाव मधील स्थानिक ग्रामस्थ बचाव कार्य करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.