Accident On Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांचा विचित्र अपघात; दोन जण जागीच ठार

Accident On Express Way: accident on Mumbai-Pune Expressway; Two were killed on the spot खोपोली पोलिसांनी सामाजिक संघटनांच्या सहाय्याने मदत कार्य सुरू केले आहे.

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज (दि.29) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीतील ढेकू गावाजवळ मुंबईच्या दिशेने जाणार्‍या चार वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ढेकू गावाजवळ द्रुतगती मार्गावर असलेल्या उतारावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या दोन मोटार, टेम्पो, कंटेनर यांच्यात हा अपघात झाला. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर गाड्यांमध्ये
अडकलेले चार जण जखमी झाले आहेत.

सर्व अपघातग्रस्त वाहने रस्त्यात असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. साडेनऊनंतर वाहने बाजूला केल्याने वाहतूक पुन्हा सुरु झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like