Chakan : वाकी खुर्द येथे जवानांच्या गाडीला अपघात; पाचजण जखमी

0

एमपीसी न्यूज – दापोडीतील सैन्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवानांना ट्रकमध्ये सरावासाठी राजगुरुनगर येथे घेऊन जात असताना वाकी खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत ट्रकची वळण घेणाऱ्या खाजगी बसला जोराची धडक बसून शुक्रवारी (दि. १४) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. जखमींना येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ट्रक चालक सुरेंद्र पाल रामलोक (वय – २८ रा. दापोडी, पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. तर या अपघातात सैन्यांच्या ताफ्यातील सुरेंद्र पाल याच्यासह उमेश पवार, मोरे, सचिन कांबळे व गणेश कांबळे ( पूर्ण नाव, गाव, पत्ता निष्पन्न नाही.) हे जखमी झाले आहेत.
याबाबतचे वृत्त असे की, सुरेंद्र पाल हे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान पुणे – नाशिक महामार्गावरून राजगुरुनगर येथे त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन जात होते. त्यावेळी वाकी खुर्द गावच्या हद्दीत एक खाजगी बस वाकी फाटा येथे वळण घेत होती. मात्र, त्या बसचा चालक रवींद्र दत्तात्रय इधापे ( रा.चाकण.) याने मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न घेता व कोणताच इशारा न पाठीमागून आलेली जवानांची गाडी त्यांना धडकून हा अपघात झाला.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like