Pune : सेल्फी काढताना तरुण 250 फूट खोल दरीत कोसळला, गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – सिंहगडावर मित्रांसोबत भटकंतीसाठी गेलेला तरुण सेल्फी काढताना 250 फूट खोल दरीत कोसळला. ही घटना रविवारी (दि.28) रोजी घडली.

हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार दळवी (वय. 28 रा. नाना पेठ) असे दरीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी मित्रांसोबत भटकंतीसाठी तुषार सिंहगडावर गेला होता. सिंहगडाच्या बारुदखाना पाईंट जवळ सेल्फी काढण्याच्या नादात तुषारचा तोल जाउन तो 250 फुट खोल दरीत कोसळला. वनसरंकण विभागाच्या कर्मचा-यांनी त्याला सुखरुप बाहेर काढले. तुषारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.