Accident :ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.14) परंदवाडी ते सोमाटणे फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावरील परंदवाडी उड्डाणपुलावर(Accident) घडला आहे.याप्रकरणी शकूर मुबारक शेख (वय 36, रा. तळेगाव दाभाडे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी टाटा ट्रक (KA-27, A- 4604) यावरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात रियाज अहमद मुख्तार कुरेशी (वय 44, रा. मामुर्डी) यांचा मृत्यू झाला आहे.

 

हे ही वाचा – Kalewadi: पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज कुरेशी हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेऊन घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने वेगात येवून त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रियाज कुरेशी खाली कोसळले व त्यांना गंभीर दुखापत(Accident) झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असून शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.