Pune : दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण घटले – डॉ. अजय चंदनवाले 

एमपीसी न्यूज – मा. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी घालून दिलेल्या वेळेच्या बंधनामुळे असे निदर्शनास आले की, यंदा फटाक्यांच्या चुकीच्या हाताळणीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण घटले  आहे.  अशा अपघातांचे रुग्ण पुणे शहरातील विविध भागांतून ससून मध्ये उपचारासाठी येत असतात.  २०१८ व २०१७ या वर्षीच्या अपघातांची तुलना केली असता असे दिसून येते की, फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये ५०% घट झाली आहे. अशी माहित ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली आहे.
बै .जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय चंदनवाले म्हणाले की, फटाके वाजविण्यासाठी घालून दिलेल्या वेळेमुळे अपघातांचे प्रमाण 50% हून  कमी झाल्याचे दिसून येत आहे.  या मुळे  साहजिकच फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या शारीरिक समस्या भविष्यात कमी दिसतील.

 सन      बाह्यरुग्ण विभाग      आंतररुग्ण विभाग 
2017      13 रुग्ण                 6 रुग्ण
2018      9 रुग्ण                   2 रुग्ण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.