_MPC_DIR_MPU_III

Pune News : खूषखबर… वैद्यकीय महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची मान्यता !

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या महत्वाकांक्षी वैद्यकीय महाविद्यालयाचा सुधारित प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अखेर मान्य केला आहे. आता पुढील शैक्षणिक वर्षात 2021-22 मध्ये 100 विद्यार्थ्यांसह हे महाविद्यालय सुरु करण्याची शिफारस राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे विद्यापीठाने केली आहे. राज्य शासनाला शिफारस करण्यात आली आहे. हा प्रस्ताव पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे.

_MPC_DIR_MPU_IV

महापालिकेने सुधारीत प्रस्ताव दिल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात हा सकारात्मक प्रतिसाद आला आहे. मुंबईतील वैद्यकीय शिक्षण संचालक आणि नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावात महाविद्यालयाची जागा न्यासाच्या मालकीची असणे आवश्यक असल्याची त्रूटी काढली होती. पालिका प्रशासनाने पालिकेच्या मालकीची जागा न्यासाला देण्यास मान्यता देऊन कागदपत्रांची पूर्तता करीत सुधारीत प्रस्ताव एमयुएचएसला सोमवारी पाठविला होता. हा प्रस्ताव विद्यापीठाने मान्य केला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम मान्यतेची प्रक्रिया पार पडणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

याकरिता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना ही संकल्पना मांडली होती. दोन वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मुख्य सभेच्या मान्यतेने या महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. महापालिकेने या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंदाजपत्रकात तरतूद केलेली आहे. गुजरातच्या अहमदाबाद महापालिकेने उभारलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर हे महाविद्यालय उभारले जाणार आहे. या महाविद्यालयासाठी डॉ. नायडू रुग्णालयाची बारा एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. राज्यशासनाकडून महाविद्यालयासाठी न्यास स्थापन करण्यास परवानगी मिळाल्यानंतर धमार्दाय आयुक्तांकडे न्यासाची नोंदणी करण्यात आली, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.

पुणे महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त श्रीमती रूबल अग्रवाल म्हणाल्या, वैद्यकीय महाविद्यालयाच्या मान्यतेसाठी अंतिम प्रस्ताव शासनाच्या  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली असून महाविद्यालयाची शिफारस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत माझी डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून सचिव स्तरावरील कार्यवाही सुद्धा लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश सुरु होऊ शकतील. महत्वाचा टप्पा पार पडला आहे.

तर महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले,मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना २०१७ साली ही संकल्पना मांडली होती. दोन वर्षांपासून या विषयाचा पाठपुरावा सुरु आहे. ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णालय उभारणे, ट्रस्ट नोंदणी आणि परवानगीसाठी एमयूएचएसला प्रस्ताव सादर करणे हे टप्पे पार पडले. एमयूएचएसने सकारात्मक शिफारस राज्य शासनाकडे केल्याने महत्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. यानंतर आता अंतिम मान्यता आणि महाविद्यालय प्रत्यक्षात उभे राहण्याची प्रक्रिया सुरु होईल.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.